Home Breaking News “आजादी की दौड” स्पर्धेत ‘क्रिश’ व ‘आचल’ अव्वल

“आजादी की दौड” स्पर्धेत ‘क्रिश’ व ‘आचल’ अव्वल

463
राष्ट्रीय क्रीडा दिवस तथा शिक्षक दिनाचे औचित्य

वणी | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिक्षकदिनी घेण्यात आलेल्या आजादी की दौड स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पुरुष गटात क्रीश मिस्री तर महिला गटात आचल कडूकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना पाच हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षण प्रसारक मंडळ, द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, राष्ट्रीय क्रीडा दिवस तथा शिक्षक दिनाच्या औचित्याने ‘आजादी की दौड’ स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, वाहतुक शाखेचे API संजय आत्राम, लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शमीम अहमद, सचिव महेंद्र श्रीवास्तव, पदसिद्ध सदस्य मंजिरी दामले व सुधीर दामले, राजाभाऊ पाथ्रडकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के कार्यकारिणी सदस्य अनिल जयस्वाल हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सुमारे चारशे पन्नास धावपटू सहभागी झाले होते. पुरुष गटातून द्वितीय क्रमांक प्रनील लांडे तर तृतीय क्रमांक ओम गारघाटे यांनी मिळवला. महिला गटातून द्वितीय क्रमांक वैशाली मालेकर यांचा तर तृतीय क्रमांक दुर्गा प्रजापती यांचा आला. द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या धावपटूस तीन हजार रुपये व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यास दोन हजार रुपये रोख रकमेसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

स्पर्धेचे संयोजक व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण तथा क्रीडा विभागाचे संचालक प्रा. उमेश व्यास यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका कथन केली. प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालक प्रा.मनोज जंत्रे यांनी केले. लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत गोडे आभार मानले.

लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयातील शारिरीक शिक्षक प्रा.कमलेश बावणे, लायन्स हायस्कूल येथील शारीरिक शिक्षक नाझिया मिर्झा, राष्ट्रीय छात्र सेनेचे काळजीवाहू अधिकारी प्रा. किशन घोगरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास जुनगरी यांचेसह राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसह दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार

Previous articleबंडू निंदेकर यांना मातृशोक
Next articleधारदार शस्त्राने गळ्यावर वार, तरुण ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.