● कोलार येथील घटना, ग्रामस्थ संतप्त
वणी | वेकोलीच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या खाजगी माती कंपनीत वाहन चालक असलेल्या 48 वर्षीय इसमाने अकरा वर्षीय बलिकेचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले.
कोळसा खाणीत उत्खनन झालेली माती अन्यत्र वाहून नेण्यासाठी अनेक खाजगी कंपन्यां कार्यरत आहे. वेकोली प्रशासन या कंपन्या कडून माती काढण्याचे व वाहून नेण्याची कामे करून घेतात.
कंत्राटी पद्धतीने कार्यरत कंपनीत अनेक परप्रांतीय मजूर कामाला आहे. कोलार (पिंपरी) येथे हिलटॉप कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत चालक म्हणून कार्यरत असलेला रवींद्र रावत याची पीडित बलिकेचा वडिलांशी ओळखी होती.
शुक्रवारी सकाळी चालक रवींद्र रावत याने बलिकेच्या वडीलाला फोन केला आणि कुठे आहे अशी विचारणा केली. त्यांनी मी शेतात असल्याचे सांगताच चालक रावत हा बलिकेचा घरी पोहचला बालिका आंघोळ करीत होती त्याने बालिकेशी गैरवर्तन केले.
घाबरलेल्या बालिकेने आपली कशीबशी सुटका करून आरडाओरड केली. यामुळे चालक रावत याने तिथून पळ काढला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सूरु आहे.
वणी: बातमीदार
ही बातमी सुध्दा वाचा…
https://rokhthok.com/2022/09/23/17475/