Home Breaking News मजूर नेत असलेल्या पिकअप वाहनाला भीषण अपघात, एक ठार 22 जण जखमी

मजूर नेत असलेल्या पिकअप वाहनाला भीषण अपघात, एक ठार 22 जण जखमी

1719
चंद्रपूर वरून बुलढाण्याला जाताना घडली घटना

यवतमाळ : चंद्रपूर येथील 20 ते 25 मजूर (laborers) पिकअप वाहनातून बुलढाणा येथे जात होते. बाभूळगाव तालुक्यातील नायगाव जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्यावरील स्थनिक तिघांना धडक देत वाहन थेट पुलाखाली कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार दि. 28 सप्टेंबर ला सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.

यदु मोतीराम जाधव (55) रा नायगाव याचा जागीच मृत्यू झाला तर दादाराव सिद्ध जाधव, देविदास धोंडबाजी कायरे रा नायगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय (Yavatmal Vasantrao Naik Government Hospital ) येथे हलविण्यात आले.

चंद्रपूर वरून बुलढाणा येथे पिकअप वाहन क्रमांक MH-28- BB- 3831मधून मजूर घेवून जात असताना हा अपघात घडला यात वाहनातील ममता सुभाष मेश्राम (32), रमेश सखाराम कांबळे (45), सुवर्णा विनायक लोनबळे (32), ज्योत्स्ना हेमराज हजारे (30), ममता सुधाकर मेश्राम (35), सुषमा दिनेश मेश्राम (35), शालू गुरुदास जराते (35), हेमराज मनोहर हजारे (35), विनायक बापूजी लोनबळे (35), डाकराम केवलराम बोरसे (35), मोरेश्वर कालिदास गेडाम (35), जयश्री यादव लोनबळे (30), निराशा हेमंत मडावी (30) यातील काही किरकोळ जखमी असून चंद्रपूर येथील मजूर असल्याची माहिती समोर येत आहे.
यवतमाळ: बातमीदार