Home Breaking News भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार

भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार

1356
Img 20241016 Wa0023

झोला या गावाजवळ घडली घटना

वणी :- वणी वरून दुचाकीने कुचना येथे जात असलेल्या दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

मृतक हा कुचना येथील रहिवाशी असल्याचे कळते. तो वणी वरून आपल्या दुचाकीने कुचना या गावाकडे जात होता. वर्धा नदीच्या पुलालगत असलेल्या झोला फाट्या जवळ त्याच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन अपघात स्थळी दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहे. मृतकाचे नाव कळू शकले नाही
वणी: बातमीदार