Home Breaking News धक्कादायक…. त्या दोन्ही प्रकरणी अपहरणाचा ‘बनाव’

धक्कादायक…. त्या दोन्ही प्रकरणी अपहरणाचा ‘बनाव’

1718

पोलीस तपासात झाले निष्पन्न

वणी: शहरात दोन दिवसात दोनवेळा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब चर्चेत आली होती. गुरुवारी सकाळी मोमीनपुरा येथील 13 वर्षीय बालकाने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने अपहरण करत होता असे स्थानिकांना सांगून खळबळ उडवली. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात अपहरणाचा ‘बनाव’ करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

गुरुवारी घडलेल्या कथित अपहरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला. मोमीनपुरा येथील बालकाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता असा काही प्रकारच घडला नाही असे तो पोलिसांना सांगत आहे. मात्र सकाळी घटनास्थळी जमलेले स्थानिक व आमच्या प्रतिनिधी ला त्याने एक अज्ञात दुचाकीस्वार आला. “चल मै तुझे छोड देता” असे म्हणत त्याला दुचाकीवर बसवले असे सांगून दिशाभूल केल्याचे उजागर झाले आहे.

गुरुवारी घडलेल्या घटनेतील दुचाकीस्वार त्या बालकाच्या वडिलांचा मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालक पायदळ जात असल्याने मदरशा पर्यंत सोडतो असे तो त्याला बोलला व सोडून दिले. बालकाच्या तो युवक ओळखीचा नसल्याने गफलत झाली असे आता बोलल्या जात आहे.

दोन दिवसापूर्वी नांदेपेरा मार्गावरील नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोर एका चारचाकी वाहनातून दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले व त्या बालकाला बळजबरीने वाहनात कोंबण्याचा प्रयत्न केला होता असे त्या बालकाने सांगितले होते. पोलिसांनी त्या प्रकरणी सखोल सत्यता पडताळली असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो बालक शाळेजवळ थांबलाच नाही असे उघड झाले. तर ते चारचाकी वाहन घटनास्थळी थांबलेच नव्हते असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

समाज माध्यमाच्या अतिरेकी वापराने कोवळी मुलं वाह्यात होत असल्याचे वास्तव उजागर झाले आहे. नानाविध कल्पना डोक्यात साचवत स्वतः च्या अपहरणाचा कथित प्रकार घडवून खळबळ माजवून देत आहेत. अशा बनावटी घटनेने समाजमनात भय निर्माण होत असून पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या दैनंदिन कृती वर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.
वणी : बातमीदार

ही बातमी सुद्धा वाचा….

https://rokhthok.com/2022/10/06/17651/

https://rokhthok.com/2022/10/04/17616/