Home Breaking News कायर येथे शनिवारी मोफत महाआरोग्य शिबिर

कायर येथे शनिवारी मोफत महाआरोग्य शिबिर

251

50 गावांतील नागरिकांना मिळणार लाभ

तुषार अतकारे | वणी तालुका काँग्रेस कमिटी व शिवभक्त मंडळ कायरच्या वतीने स्वास्थम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरच्या सहकार्याने 8 ऑक्टोबर रोजी कायर येथील गायत्री मंगल कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात परिसरातील 50 गावांतील नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती डॉ. महेंद्र लोढा, मुख्य समन्वयक यांनी दिली

या शिबिराचे उद्घाटक म्हणून खासदार सुरेश धानोरकर, अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात हृदयरोग, मेंदूरोग, पोटविकार, मूत्ररोग, बालरोग, प्रसूती व स्त्रीरोग, नेत्र, दंतरोग, अस्थिरोग, फिजिओथेरेपी व इतर सामान्य आजाराची तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिरात डॉ. पंकज हरकुट, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. प्रतीक उत्तरवार, डॉ. निखिल खोब्रागडे, डॉ. अमित देशपांडे, डॉ. गणेश लिमजे, डॉ. सूरज चौधरी, डॉ. रोहित चोरडिया, डॉ. शिरीष कुमरवार, डॉ. महेंद्र लोढा, डॉ. संचिता नगराळे, डॉ. नीलेशा बलकी, डॉ. सुनील जुमनाके, डॉ. संदीप मानवटकर, डॉ. पवन राणे, डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. अक्षय खंडाळकर, डॉ. अनिकेत अलोणे, डॉ. स्वप्निल गोहोकार, डॉ. विजय राठोड, डॉ. अमोल पदलमवार, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. प्रतीक कावडे, डॉ. रौनक कोठारी, डॉ. प्रदीप ठाकरे, डॉ. नईम शेख, डॉ. विवेक गोफणे, डॉ. दिलीप सावनेरे हे आरोग्य तपासणी करणार आहेत.

या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. महेंद्र लोढा, मुख्य समन्वयक पुरुषोत्तम आवारी, वणी तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर, शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर अंबोरे यांनी केले आहे.
वणी: बातमीदार