● आई व बहिणीला आणायला मुंबईला जात होता
तुषार अतकारे: यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच बस मुंबईला जात असताना शनिवारी पहाटे नाशिक जवळ भीषण अपघात झाला. यात मुंबईत वास्तव्यास असलेल्या आई व बहिणीला दिवाळीसाठी आणायला निघालेल्या मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अजय मोहन कुचनकर (17) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील निवासी होता. आई दुर्गा (33) व बहीण साक्षी (14) ही मुबंई येथे एका कंपनीत कामाला होती. दिवाळीच्या उत्सवाकरिता तो त्यांना आणण्यासाठी शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर ला दुपारी 3: 30 वाजताच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स ने मुंबई करिता रवाना झाला.
चिंतामणी ट्रॅव्हल्स च्या बस क्रमांक MH- 29- AW- 3100 ला नाशिक जवळ औरंगाबाद मार्गावरील कैलासनगर परिसरात हॉटेल मिरची जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने बस ला जबर धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात बसने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले. सर्व प्रवाशी साखरझोपेत असताना विपरीत घडले आणि क्षणात सर्व राखरांगोळी झाली.
मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथे वास्तव्यास असलेल्या ‘अजय’ चा दुर्दैवी मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. दिवाळीसाठी आई व बहीण गावाला यावी व सण उत्साहात साजरा करावा हे अधांतरीच राहिले असून कुचनकार परिवार व ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
:वणी बातमीदार