Home सामाजिक सामाजिक दृष्टिकोन जपणारी ‘गोदावरी’

सामाजिक दृष्टिकोन जपणारी ‘गोदावरी’

111

औचित्‍य जागतिक रक्तदान दिनाचे

सुनील पाटील || जागतिक रक्तदान दिनाचे औचित्‍य साधुन गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटीव सोसायटी च्‍या वणी शाखेने रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. कार्यक्रमांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा होते. तर प्रमुख अतिथी म्‍हणुन बालरोग तज्ञ डॉ. सुनीलकुमार जुमनाके यांची उपस्थिती होती.

अध्‍यक्षस्‍थानावरुन बोलतांना खुराणा म्‍हणाले की, गोदावरी अर्बन ही बँकिंग सोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी बँक असुन नेहमी नवनवीन उपक्रम राबवित, समाजात एक वेगळा ठसा उमटवत असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आयोजीत  शिबिरात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. नागपूर येथील एक युनिट व वणीतील सुगम हॉस्पिटल मधील लाईफ लाईन रक्तपेढी यांच्‍या सहकार्यांने शिबिर संपन्‍न झाले. यावेळी रक्तदात्यांचा सहभाग दिसुन आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राजु गव्हाणे यांनी तर आभार सुरज चाटे यांनी मानले, या कार्यक्रमासाठी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, भद्रावती शाखेचे शाखा अधिकारी अनिरुद्ध पाथ्रडकर, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, मंगेश करंडे, शुभम पिंपळकर, सब स्टाफ आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तथा समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता उपस्थित होते.
वणीः बातमीदार