Home Breaking News अद्याप कारवाई का नाही, बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक

अद्याप कारवाई का नाही, बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक

1029

ठाणेदारा विरोधात फुंकले रणशिंग
पत्रकारावरील हल्‍याचे पडसाद

सुनील पाटील | पत्रकारांवरील प्राणघातक हल्ला, शहरात वाढलेल्या घरफोडीच्या घटना, पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारांसोबत साधलेला संवाद, शहरात सर्वच स्‍तरातुन उमटत असलेला संताप तरी सुद्धा फलश्रुती शून्य. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली असून ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची तडकाफडकी उचलबांगडी करावी अशी मागणी SDO यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

शहरात कायदा व सुव्‍यस्‍था बिघडली आहे. मोठया प्रमाणात चोऱ्या, लुटमारी, दुचाकी चोऱ्या व अवैद्य धंद्यात वाढ झाली आहे. नागरीकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. पत्रकारावर झालेल्‍या हल्‍यानंतर आरोपी पकडण्‍यात आला नसल्‍याने अकार्यक्षम ठाणेदाराच्‍या बदलीची मागणी बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेने केली आहे.

शहरात चोरट्याने पत्रकारावर प्राणघातक हल्‍ला केल्‍याची घटना नुकतीच घडली. अद्यापपर्यंत आरोपीचा पोलीसांना शोध लागलेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अवैद्य धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी कर्तव्यतत्पर अधिकारी द्यावा असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

वणीतील बाळासाहेबांची शिवसेना एक्टिव्ह झाली आहे. याकरीता संघटनेने ठाणेदारा विरोधात रणसिंग फुंकले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच घरफोडी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

येथील पोलीस विभाग सपशेल अपयशी ठरत आहे. ठाणेदारांच्‍या बदलीची मागणी होत असतांना जिल्‍हा पोलीस अधिक्षक ठाणेदारासाठी सुरक्षा कवच बनले आहे. तरी सुद्धा दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्‍यथा बाळासाहेबांची शिवसेना आंदोलनाचे अस्‍त्र उगारेल असा ईशारा निवेदणातुन देण्‍यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेचे नेते सुधाकर गोरे, मनीष सुरावार व टीकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी किशोर नांदेकर, ललित लांजेवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी: बातमीदार