Home Breaking News रेल्वेची मुजोरी, मुख्य रस्त्यावरच लावली रॅक

रेल्वेची मुजोरी, मुख्य रस्त्यावरच लावली रॅक

765

गावकऱ्यांना वेठीस धरणारा प्रकार

सुनील पाटील |: राजूर कॉलरी येथे सातत्याने चालणारी रेल्वेची मुजोरी पुन्हा एकदा उजागर झाली आहे. रिंग रोडवरून गावात येणारा मुख्य रस्ता आहे आणि गिट्टी भरण्यासाठी रेल्वेने सायडिंगवर रॅक लावल्यामुळे तो वाहतुकीचा रस्ताच बंद झाला आहे. परिणामी संपूर्ण वाहतुकच ठप्प झाली आहे. हा प्रकार गावकऱ्यांना वेठीस धरणारा असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

रेल्वे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात रेल्वे सायडिंग चा विस्तार करीत आहे. रहिवासी क्षेत्रालगत सायडिंगचा होणारा विस्तार आणि स्थानिकांना विस्थापित करण्याच्या हालचाली यामुळे गरिब रहिवासीयांना प्रचंड मानसिक दबाव झेलावा लागत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा कुरघोडी करीत मुजोरीने मुख्य रस्त्यावर उभारलेल्या सायडिंगवर रैक लावून गावकऱ्यांवर नवीन संकट उभे केले आहे. गावात येणारा मुख्य रिंग रोड रस्त्याच बंद पडल्याने गावात येजा करणारी वाहतुकच पूर्णपणे थांबली आहे. रेल्वेचा हा प्रकार असाच सुरू राहिल्यास येथील रहिवाशांना मात्र शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून होणारा अतोनात त्रास लक्षात घेता राजूर बचाव संघर्ष समितीचे माध्यमातून “सायडिंग हटाव व गाव बचाव” ही मोहीम उघडण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर पासून वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येत असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.
वणी: बातमीदार