Home वणी परिसर दिव्याचं अस्तित्व म्हणजेच दीपोत्सव….सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा- डॉ. महेंद्र लोढा

दिव्याचं अस्तित्व म्हणजेच दीपोत्सव….सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा- डॉ. महेंद्र लोढा

110
“सस्नेह नमस्कार”
दिवाळी धनश्रीमंतांचं इमलेही उजळते आणि मनश्रीमंताचे दरवाजेही उघडते. दिवाळी बाहेरील तिमिराला प्रकाशमान तर करतेच; पण त्याबरोबरच आपल्या मनावर साठलेलं मळभ दूर करून प्रसन्नतेची, उल्हासाची ज्योत जागृत करते. दिवाळी या नावातच दिव्याचं अस्तित्व म्हणजेच दीपोत्सव….
लखलख चंदेरी चांदण्यांनी आकाशाचा निळा गाभारा सजलेलाआहे. थंडीचा हलकासा अत्तरस्पर्श उन्हालाही मऊ-मुलायम बनवतो आहे. दिव्यांचा केशरी-पिवळसर प्रकाश अंधकार दूर करत आहे. प्रकाशाचा हा प्रसन्न उत्सव म्हणजेच दीपावली. जीवनातला अंधार दूर सारून उजेडाला सामोरं जाण्याचा उत्सव, दीपोत्सव..

आपला
डॉ. महेंद्र लोढा
काँग्रेस नेते, वणी