● अल्पभू-धारक शेतकऱ्यांना बियाणे वाटप
● बळीराजा संकटात असताना मनसेची मदत
रोखठोक | राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना ह्या राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बियाणे शेती साहित्याच्या वाटपाचा पहिला टप्पा गुरुवार दि. 3 नोव्हेंबरला येथील वसंत जिनिंग सभागृहात होत असून परिस्थितीतून सावरण्याचे बळ मिळल्याची भावना शेतकरी व्यक्त करताहेत.
असमानी संकटाने बेजार झालेल्या वणी विभागातील शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आल्याचे वास्तव सत्यात उतरले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे वाटपाचा कार्यक्रम आणि भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्याला मनसेची मुलुख मैदानी तोफ प्रकाश महाजन, नेते दिलीप बापु धोत्रे, राज्य उपाध्यक्ष आनंद ऐबंडवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पावसाळ्यात राज्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला होता. त्यातच वणी उप विभागातील परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. अकस्मात शेतकरी रस्त्यावर आला. भविष्यातील स्वप्न वाहून गेले, पिकं सडली, पशुधन दगावले, शेतीपयोगी साहित्य संपुष्टात आले. आपत्तीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर सातत्याने मतदारसंघात विविध उपक्रम राबवतात. आपत्तीच्या काळात सर्वप्रथम धावून जातात, त्यांनी उप विभागात केलेली संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा सतत जनहितार्थ व समाजपयोगी कार्य करत असल्याने वाढणारा जनाधार उंबरकर यांच्या कार्यप्रणालीचे फलित आहे.
वणी: बातमीदार