● प्रतिस्पर्धी गटाची माघार
रोखठोक | येथील नामांकित असलेल्या केशव नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाली होती. दोन गटाने नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र शेवटच्या क्षणी प्रतिस्पर्धी गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक अविरोध झाली.
केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिल्ह्यात वणी, यवतमाळ, आर्णी, पांढरकवडा व घाटंजी येथे शाखा आहे. अल्पावधीतच या संस्थेने अध्यक्ष चंद्रशेखर खोंड व सचिव अनिल आक्केवार यांच्या कार्याने नाव लौकिक प्राप्त केले आहे. संचालकांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या संस्थेची निवडणूक 13 नोव्हेंबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.
● मतदार नसताना दाखल केला अर्ज ●
कोणतीही निवडणूक वाढविण्याकरिता मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. त्या शिवाय उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. मात्र केशव नागरीच्या मतदार यादीत नाव नसतानाही उमेदवारी दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्ज बाद केल्यामुळे त्या उमेदवाराचा चांगलाच हिरमोड झाल्याची चर्चा आहे.
या निवडणुकीत दोन गट आमने सामने उभे ठाकले होते. काहींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अर्ज छाननी मध्ये निमेकर गटाच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले होते. त्यामुळे या गटाने जिल्हा निबंधकाकडे दाद मागितली होती. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली होती.
केशव नागरी ची निवडणूक अविरोध व्हावी या करिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही होता. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी यात महत्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे उरलेल्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने खोंड व आक्केवार गटाचे 13 उमेदवार अविरोध निवडून आले आहे. त्यामुळे अनेकांचे मनसुबे उधळल्या गेले असल्याचे बोलले जात आहे
वणी: बातमीदार