● लॉयन्स जपताहेत विद्यार्थ्यांचे कलागुण
रोखठोक | ‘जागतिक हात धुवा दिवस’ दिनाचे औचित्य साधून युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए. पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘राज्यस्तरीय हात धुणे अभियान’ अंतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुल व ज्युनीअर कॉलेज चा विदयार्थी विहान विजय महाजन याने रेखाटलेले चित्र राज्यात अव्वल ठरले आहे.
जागतिक हात धुणे दिवस राज्यस्तरीय अभियान अंतर्गत वर्ग 4 थी ते 10 च्या विदयार्थ्यां साठी चित्रकला, घोषवाक्य, हातधुणे दांडीया, हात धुण्याची गाणी (व्हिडीयो/ ऑडीयो) स्पर्धेचे आयोजन करणात आले होते. या चित्रकला स्पर्धेत राज्यातील 20 जिल्यातील एकुण 5 हजार 156 विदयार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता.
संपूर्ण राज्यातून 1 ल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला विहान महाजन हा येथील लॉयन्स स्कुल मध्ये इयत्ता 5 वीत शिकतो. त्याने रेखाटलेले चित्र राज्यात अव्वल ठरले. त्याला शिक्षीका योगीता नागरकर, वर्ग शिक्षीका प्रीती निकुरे तसेच आई – वडीलांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्यातून प्रथम आलेल्या विहानच्या कलागुणांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
विहानच्या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळा समितीचे अध्यक्ष शमीम अहमद, उपाध्यक्ष डॉ. के. आर. लाल, सचिव महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष रमेश बोहरा, संचालक डॉ. आर.डी.देशपांडे, सुधीर दामले, सी. के. जोबनपुत्रा, बलदेव खुंगर, मंजिरी दामले, प्राचार्य प्रशांत गोडे व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.
वणी: बातमीदार