Home Breaking News रिलायन्स मॉलच्या व्यवस्थापकाचे अपघाती निधन

रिलायन्स मॉलच्या व्यवस्थापकाचे अपघाती निधन

2642

वरोरा मार्गावर सावर्ला जवळची घटना

रोखठोक |: आपले कर्तव्य आटोपून रात्री वरोरा येथील घरी दुचाकीने जात असताना रुग्णवाहिकेने सावर्ला जवळ जबर धडक दिली. या अपघातात 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

आनंद झा (35) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो येथील रिलायन्स मॉल मध्ये व्यवस्थापक म्हणून कर्तव्यावर होता. तर वरोरा येथे वास्तव्यास असल्याने दुचाकीने ये- करायचा.

आनंद हा नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर आला होता. रात्री मॉल बंद झाल्यावर ऍव्हेंजर या दुचाकीने वरोरा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेने जबर धडक दिली.

अपघात प्रचंड भीषण होता यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुचाकीने पेट घेतला होता. त्याचेवर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला आहे.
वणी: बातमीदार