Home Breaking News खासदार व माजी आमदारांची ‘बुलेटस्वारी’

खासदार व माजी आमदारांची ‘बुलेटस्वारी’

1222

औचित्य भारत जोडो यात्रेचे
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्साह

रोखठोक | भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा सुरु आहे. यामुळे ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. भारत जोडो यात्रेचे औचित्य साधून वणीत भव्य बाईक रॅलीचे आयोजनकरण्यात आले होते. यावेळी खा. बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांची बुलेटस्वारी आकर्षण ठरली.

राज्यात भारत जोडो यात्रा येऊन आता चार दिवस झालेत. लोकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा अनेकांसाठी आशेचा किरण आहे तशी पक्षासाठीही ती नवसंजीवनी देणारी आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चार राज्यातून प्रवास करुन महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींचं आणि भारत जोडो यात्रेचं दणक्यात स्वागत झालं. राज्यात भारत जोडो यात्रा येऊन आता चार दिवस झाले आहे. पदयात्रेत स्थानिक जनतेचा मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह संचारला आहे. खा. धानोरकर व माजी आमदार कासावार यांच्या नेतृत्वात संजय खाडे, ऍड. देविदास काळे, राजाभाऊ पाथ्रडकर, टिकाराम कोंगरे, शंकर व-हाटे, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात आली.

बाईक रॅलीची सुरुवात रंगनाथस्वामी मंदिरापासून झाली. गांधी चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, बस स्टॅण्ड ते खा. धानोरकर यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप झाला. आयोजित रॅलीत कॉंग्रेस कार्यकर्ते व स्थानिक जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

याप्रसंगी प्रशांत गोहोकार, पलाष बोढे, तेजराज बोढे, प्रमोद निकुरे, जयकुमार आबड, घनश्याम पावडे, विनोद गोडे, गजानन खापणे, अशोक धोबे, रविद्र धानोरकर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभिडकर, इजहार शेख, बालू सोनटक्के, वंदना आवारी, संध्या बोबडे, वंदना धगडी, ठेपाले , साधना गोहोकार, साधना ठाकरे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
वणी: बातमीदार