Home Breaking News नगर पालिकेचा अतिक्रमणावर ‘हातोडा’

नगर पालिकेचा अतिक्रमणावर ‘हातोडा’

1079

शहरात मोहिमेला सुरवात

रोखठोक |- शहरात व्यावसायिकानीं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे.

वणी शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. तसेच शहरातील अंतर्गत व बाह्य मार्गावर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शहरात असलेल्या शासकीय कार्यालयासमोर व्यवसाय थाटल्याने कार्यालय दिसेनासे झाले आहे. तसेच अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे

शहरातील अंतर्गत रस्ते आधीच अरुंद आहे.त्यात झालेले अतिक्रमण यामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याचेच झाले आहे. वाहतूक सुरळीत व्हावी या करिता वाहतूक पोलीस विभागाने नगर पालिका प्रशासनाला अतिक्रमण काढण्याबाबत पत्र दिले होते.

मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी सदर पत्राची दखल घेत शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे. दि 15 नोव्हेंबर ला टिळक चौकात असलेल्या डाक विभागा समोरील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही दिवसातच शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहे.

शहरात अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. व्यावसायिकानी स्वतः हुन आपली अतिक्रमणे काढून घ्यावी. एक आठवडा ही मोहीम सुरू राहणार असून जनतेने पालिका प्रशासनाला सहकार्य करावे.
अभिजित वायकोस
मुख्याधिकारी, नगर परिषद वणी