प्लस्टीक वापरणाऱ्या व्यापाऱ्याला दंड
रोखठोक :- सलग दुसऱ्या दिवशीही पालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम सुरू ठेवली आहे.याच दरम्यान बंदी असलेल्या प्लस्टीक पिशवाचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्याला 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
पालिका प्रशासनाने मंगळवार दि 15 नोव्हेंबर पासून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकां वर कारवाहीचा बडगा उगारला आहे.झालेल्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्ते अरुंद झाले.त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याचेच झाले आहे.
नगर पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग संयुक्त सहकार्याने अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराचा मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या टिळक चौकातून अतिक्रमणाला सुरवात करण्यात आली आहे.
बुधवारी डाक विभाग, वन विभाग कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालया समोरील फुटफात वरील दुकाने काढण्यास सुरवात केली आहे.या मोहिमेत मुख्याधिकारी अभिजित वायकोस हे सहभागी झाले आहे.
महाराष्ट्रात प्लस्टीक पिशव्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.मात्र काही व्यापारी याचा वापर करीत असल्याचे मुख्याधिकारी यांच्या लक्षात येताच टिळक चौकातील पावभाजी सेंटरला 5 हजाराचा दंड ठोठावला आहे. पालिकेने आता पर्यंत प्लस्टीक पिशव्या वापणाऱ्या कडून 30 हजाराची वसुली केली आहे.सदर कारवाही आरोग्य निरीक्षक भोला ताराचंद,शैलेश ब्राम्हणे,रोहित बिसमोरे,यांनी केली