● ASO, STI, तथा PSI (collifide)
रोखठोक | मनात जिद्द असेल तर कोणताही गड सर करता येतो. ग्रामीण भागात शिक्षण घेतलेला शेतकरी पुत्र अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून खडतर असलेल्या MPSC ची परीक्षा देतो आणि एकाचवेळी तीन पदाना गवसणी घालतो. हे यश मिळवले तालुक्यातील कायर येथे वास्तव्यास असलेल्या प्रशांत याने.
प्रशांत बिंबिसार निखाडे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेतले. कायर येथील विवेकानंद विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतल्या नंतर पुढील शिक्षणासाठी तो वणीला गेला. लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्याने BSC ची पदवी घेतली.
प्रशांत बालपणापासून हुशार होता, भावंडात तो सर्वात लहान, वडील शेतकरी तर आई गृहिणी. विज्ञान शाखेत पदवी मिळवल्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरवले. यासाठी तो पुण्याला गेला, परीक्षेची कसून तयारी केली. अवघ्या तिन वर्षात प्रशांत ने एकाच वेळी ASO, STI, तथा PSI (collifide)या तीन परीक्षेत बाजी मारली. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक व मित्रमंडळी ना दिले.
वणी : बातमीदार