● कोळसा खाणी मुळे जनजीवन धोक्यात
रोखठोक |:- परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणी आहे. वेकोली प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याने जनजीवन धोक्यात आले आहे. यावर त्वरित तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देत मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वेकोली कार्यालयावर धडक दिली.
परिसरात वेकोलीच्या 11 कोळसा खाणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोळशाचे उत्खनन केल्या जात आहे. कोळसा खाणीतून कोळसा काढतांना नियमांचे पालन वेकोली प्रशासनाकडून होतांना दिसत नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता तर त्यामध्ये भर पडुन नागरीकांना स्वतः चा जीव गमवावा लागत आहे.
मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दि 5 डिसेंबर ला वेकोलीच्या भालर येथील क्षेत्रिय महा मुख्यप्रबंधक, यांच्या कार्यालयावर धडक दिली व वेकोलीच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. वेकोलीने लावलेली ऑस्ट्रेलियन बाभूळ झुडपे त्वरीत नष्ट करावी. जेणेकरून जनतेचा आरोग्यास विपरीत परिणाम होणार नाही. सोबतच नरभक्षक वाघासोबत इतरही प्राणी मानव जीवित्वाला धोका निर्माण करणार नाही.
सोबतच पुनर्वसनाचा विषय त्वरीत मार्गी लावुन जनतेस न्याय दयावा. वे.को. ली च्या प्रदुषणामुळे शेतीचे पिकाचे नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यास त्वरीत मोबदला देण्यात यावा. तसेच वे.को. ली विभागात असणाऱ्या स्थानिकांना सर्व प्रथम रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.
वाघाचा वावर खूप वाढला आहे त्यामुळे वाघाचे वास्तव्य असणाऱ्या गावांना वनविभागाला सोबत घेऊन गावा गावामध्ये रक्षक देण्यात यावे. गावातील महिलांकरिता सुविधा पुरविण्यात याव्या. गावात व गावालगत पथदिव्याची व्यवस्था त्वरीत करण्यात यावी. रस्त्याची दुरावस्था याकडे लक्ष केंद्रीत करून रस्त्याची कामे त्वरीत हाती घेण्यात यावी.
कोळसा खाणी बाबत प्रदुषण विभागाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. वेकोली अंतर्गत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना त्वरीत बस सुविधा पुरविण्यात यावी. वे.को.ली अंतर्गत दत्तक असणाऱ्या गावांना संपुर्ण सुविधा देऊन विकास कामे करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा वेकोली विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वणी : बातमीदार