Home Breaking News सुगंधित तंबाखूचे 40 डब्बे जप्त, मोठे मासे गळाला लागतील काय !

सुगंधित तंबाखूचे 40 डब्बे जप्त, मोठे मासे गळाला लागतील काय !

1025

प्रतिबंधित तंबाखूची प्रचंड विक्री

रोखठोक |- राज्यबंदी असलेला सुगंधित तंबाखूची विक्री जोमात सुरू आहे. 3 डिसेंबरला साई नगरी परिसरात पोलिसांनी 37 हजार रुपये किमतीचे 40 सुगंधित तंबाखूचे डब्बे जप्त केले आहे. मात्रकधीतरी मोठे मासे गळाला लागतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे. मात्र लगतच असलेल्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाकूची आयात होत आहे. शहरात प्रतिबंधित तंबाखू विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे.

शहरातील गांधी चौक, जुने बस स्थानक, विराणी टॉकीज परिसर हे मुख्य केंद्र बनले आहे. मात्र बड्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही केल्याचे ऐकिवात नाही.

दि 3 डिसेंबर ला मानकी येथील वैभव कनाके (19) हा युवक दुचाकीवरून सुगंधित तंबाकू घेऊन जात असतांना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे घनश्याम दंदे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई ASI डोमाजी भादिकर, विठ्ठल बुरुजवाडे, सागर सिडाम यांनी केली.
वणी : बातमीदार