● गाय व गोरह्याला केले घायाळ
● पिंपरी शिवारात एकूण किती वाघांचा वावर
रोखठोक | वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नांती नरभक्षी वाघाला बुधवारी सकाळी जेरबंद केले. मात्र अवघ्या काही कालावधीतच कोलार पिंपरी शिवारात वाघाने गाय व गोरह्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्यामुळे पुन्हा भययुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
जग्गु सातपुते व निलेश देहारकर हे पिंपरी कोलेरा येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या गाय व गोरह्याला वाघाने बुधवार दि. 7 डिसेंबर ला दुपारी 3 ते 5 वाजताच्या दरम्यान लक्ष केले. त्या पशुधनावर हल्ला चढविण्यात आला. तत्पूर्वी वन विभागाने नरभक्षी वाघाला जेरबंद केल्याची खळबळजनक बातमी प्रसारित झाली होती. स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आणि ही घटना उजेडात आली.
तालुक्यात नरभक्षी वाघाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. दोघांचा बळी आणि एक तरुण जखमी झाल्यानंतर वन विभाग एक्शन मोड मध्ये आलेत. चाळीस कर्मचारी, ट्रॅप कॅमेरे, पिंजरा आणि डॉट मारून बेशुद्ध करण्याची रणनीती आखण्यात आली. अखेर बुधवार दि. 7 डिसेंबरला सकाळी नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात रेस्क्यू पथकाला यश आले मात्र पुन्हा वाघाचा पशुधनावर झालेला हल्ला प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
कोलार पिंपरी परिसरात वाघ व वाघीण वास्तव्यास असावे असा कयास वर्तवण्यात येत असून या बाबत आमच्या प्रतिनिधींनी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे. नरभक्षी वाघाला पकडण्यात आल्यामुळे नागरिक, शेतकरी, शेतमजूर व वेकोली कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास घेतला ही बाब औटघटकेची ठरली आहे.
वणी : बातमीदार
ही बातमी सुद्धा महत्वाची….
https://rokhthok.com/2022/12/07/18243/
https://rokhthok.com/2022/12/07/18231/