Home Breaking News प्रदीप शिरस्कारांनी घेतला वणी ठाण्याचा प्रभार

प्रदीप शिरस्कारांनी घेतला वणी ठाण्याचा प्रभार

1386

अखेर वणी ठाण्याला वाली लाभला

रोखठोक | शहरात वाढत असलेल्‍या चोरीच्या घटनेमुळे नागरीक भयभित झाले होते. त्यातच चोरट्याने पत्रकारावर प्राणघातक हल्ला केला. पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आणि तत्कालीन ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना रजेवर जावे लागले. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर ठाणेदार पदाचा तात्पुरता प्रभार प्रदीप शिरस्कार यांनी शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता घेतला.

मागील दीड महिन्यांपासून वणी ठाण्याचे कामकाज ठाणेदारांशिवाय सुरू होते. जिल्ह्यात वणी महत्वाचे ठाणे म्हणून ओळखल्या जाते. शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेची शृंखला सुरू होती. त्यामुळे ठाण्याला चांगला अधिकारी मिळावा अशी रास्त मागणी वणीकर जनतेकडून होत होती.

वणी, ठाणेदार

अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांचेवर वणी ठाण्याची तात्पुरती जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी LCB प्रमुख म्हणून कार्य केले आहे त्यानंतर सिटी पोलीस ठाणे, यवतमाळ व सध्या ते नियंत्रण कक्षात होते. येथे चोरट्यानी चांगलाच उच्छाद मांडला आहे. यामुळे नवीन ठाणेदारांसमोर चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आहे.
वणी : बातमीदार