● निवडणूक हिमाचल प्रदेशातील
रोखठोक | काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चंद्रपूर – आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांना हिमाचल प्रदेशातील चार विधानसभा मतदारसंघाचा प्रभार सोपवला होता. नियोजनबद्ध रणनिती व स्थानिक कार्यकर्त्यांत समन्वय स्थापित करून निवडणुकीच्या रणसंग्रामात झंझावात निर्माण केले. या चार पैकी तीन विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाला आहे.
गुजरात व हिमाचल प्रदेश च्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. देशाचे लक्ष या निवडणुकीत लागले होते. गुजरात मध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपने तर हिमाचल मध्ये काँग्रेस पक्षाने विजयी बहुमत प्राप्त करत भाजपच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. हिमाचल प्रदेशात भारत जोडो यात्रेचा प्रभाव जाणवला.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे लढवय्या नेता म्हणून ख्यातिप्राप्त आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचेवर हिमाचल प्रदेशातील चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. पंधरा दिवस ते तेथे ठाण मांडून होते, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेत त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली.
हिमाचल प्रदेशातील नुपूर, इंदोरा, फतेहपुर व जवाली मतदार संघात त्यांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका लावल्या. निवडणूक रणनिती आखत कार्यकर्त्यांना दिशा निर्देश देत जोश निर्माण केला. यातील नुपूर मतदारसंघ वगळता तीन विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांनी मोठया फरकाने विजय मिळवला आहे.
बाळू धानोरकर यांनी हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत घेतलेली मेहनत आणि आखण्यात आलेली रणनिती सफल झाली असून पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीचे सार्थक झाल्याची भावना स्थनिक कार्यकर्ते व्यक्त करत आहे.
वणी : बातमीदार