● 4 हजाराची लाच मागणे भोवले
रोखठोक | येथील व्हिडीओ गेम पार्लर चे नूतनीकरण करण्याकरिता 4 हजाराची लाच मागणारा विद्युत निरीक्षक ACB च्या जाळ्यात अडकला आहे. शहरातील नगर परिषदे जवळ व्हिडीओ गेम पार्लर आहे. नियमानुसार दरवर्षी याचे नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे फिर्यादी याने नूतनीकरणासाठी अर्ज सादर केला होता.
नूतनीकरणासाठी विद्युत मांडणी अहवाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे यवतमाळ येथील वीज वितरण कंपनी चे विद्युत निरीक्षक नितीन भालचंद्र पानतावणे हे निरीक्षण करण्यासाठी वणी येथे आले होते.
निरीक्षणाचा अहवाल तयार करून देण्यासाठी पानतावणे यांनी फिर्यादी याला 4 हजाराची मागणी दि 14 डिसेंबर ला केली होती. त्यामुळे फिर्यादी याने याबाबत यवतमाळ येथील लाच लुचपत विभागाला कळविले होते.
दि 15 डिसेंबर ला विद्युत निरीक्षक पानतावणे यांना 4 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक मारोती जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, उप निरीक्षक संजय कांबळे, शिपाई वसीम शेख, सचिन भोयर, राकेश सावटाकळे, महेश वाकोडे यांनी केली
वणी: बातमीदार