Home Breaking News अंतरजिल्हा चोरट्यांचा पाठलाग, तिघे ताब्यात

अंतरजिल्हा चोरट्यांचा पाठलाग, तिघे ताब्यात

1153

शिरपूर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

रोखठोक | तालुक्यातील कायर शिवारात मोबाईल टॉवर च्या तब्बल 24 बॅटऱ्याची चोरी करून पिकअप वाहनाने पलायन करणाऱ्या अंतरजिल्हा चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करून करण्यात आली.

कायर परिसरातील इंडस कंपनीचे आयडिया व जिओ प्रोव्हाडर मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्याची चोरी करण्यात येत होती. ही माहिती रात्री 12: 30 वाजता शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड याना मिळाली. त्यांनी लागलीच सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.

मोबाईल टॉवर जवळ पोहचले असता मेंटेनन्स करणाऱ्या व्यक्तीने घटनेचे व्यवस्थित विवरण कथन केले. 24 बॅटऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH-34 AV – 2059 मध्ये टाकून वणी मार्गाने गेल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्या वाहनाचा पाठलाग केला.

वणी मार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून काही अंतरावरवर पिकअप वाहनाला अडवण्यात आले. वाहनांची झाडाझडती घेतली असता त्यात अमायराराजा व एच. बी. एल कंपनीच्या 24 बॅट-या आढळून आल्यात.

यावेळी मोहम्मद शाहीर मोहम्मद दाउद शेख (38), महोम्मद युनुस रहोमोददीन शेख (30) दोन्ही रा. बल्लारशाह जिल्हा चंद्रपूर, शेख आसीफ शेख सुवान (22) रा. मौलाना आझाद बोर्ड बल्लारशाह यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे कडून 1 लाख 67 हजार रुपये किमतीच्या बॅट-या व पिकअप वाहन असा एकूण 4 लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, पोना विलास जाधव, पोना अभीजीत कोषटवार, घोडाम, गजानन सावसाकडे, राजन ईसनकर यांनी केली आहे.
वणी: बातमीदार

Previous articleकोंबड बाजारावर धाड, सहा अटकेत
Next articleदुर्दैवी…..पंधरा ते वीस मोकाट जनावर दगावले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.