Home Breaking News शिक्षक पात्रता परीक्षेत भावी शिक्षक नापास

शिक्षक पात्रता परीक्षेत भावी शिक्षक नापास

662

राज्याचा निकाल 3.70 टक्के

रोखठोक |- महाराष्ट्र शासनाने शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा पास करणे अनिवार्य केले आहे. नुकताच टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात राज्यातून केवळ 3.70 टक्केच, उमेदवार शिक्षकपदासाठी पात्र ठरले आहे. त्यामुळे या परीक्षेत भावी शिक्षकच नापास झाल्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

समाजात शिक्षकाला आदराच स्थान आहे. पिढी घडविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. चांगले विद्यार्थी घडावे याकरिता शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. मात्र सध्यस्थितीत मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आवाहन उभे असल्याने मराठी शाळांची विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे.

अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरच शिक्षक भरती करणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे. चांगल्या दर्जाचे शिक्षक मिळावे व घोडा बाजार थांबवा, पारदर्शक भरती व्हावी, या करिता शिक्षक भरती, शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी) सुरू केली आहे.

आता शिक्षक व्हायचे असेल तर ही परीक्षा पास करणे अनिवार्य झाले आहे. 21 नोव्हेंबरला राज्यात टीईटी ची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल मात्र धक्कादायक लागला आहे. पहिली ते पाचवी गटात 2 लाख 54 हजार 428 उमेदवारांनी परीक्षा दिली होती या मध्ये केवळ 9 हजार 674 पात्र ठरले आहे.

6 वी ते 8 वी गणित व विज्ञान करिता 64 हजार 647 जणांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 937 पात्र झाले आहे. तर वर्ग 6 वी ते 8 वी सामाजिकशास्त्र विषयाकरिता 1 लाख 49 हजार 604 परीक्षार्थींना परीक्षा दिली होती. 6 हजार 711 परीक्षार्थीं उत्तीर्ण झाले आहे. या तिन्ही गटात 4 लाख 68 हजार 679 भावी शिक्षकांनी परीक्षा दिली होती मात्र केवळ 17 हजार 322 पात्र ठरले याची टक्केवारी काढली तर 3.70 टक्के पात्र झाले आहे.
वणी : बातमीदार