Home Breaking News दानशूर मित्रांनो, आता परीक्षा तुमचीच, ‘त्या’ बाळाचे करायचे आहे “लिव्हर ट्रान्सप्लांट”

दानशूर मित्रांनो, आता परीक्षा तुमचीच, ‘त्या’ बाळाचे करायचे आहे “लिव्हर ट्रान्सप्लांट”

511

आभाळच फाटले, शिवता येईल का ?

रोखठोक | अवघ्या सहा महिन्याचं बाळ, जगाचा आरसा अद्याप तिने बघितला नाही. तज्ञ डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्यात. त्या निरागस बाळाच्या लिव्हरमध्ये गंभीर दोष निर्माण झालाय. लिव्हर ट्रान्सप्लांट केले तरच…..! दानशूर मित्रांनो, आता परीक्षा तुमचीच, तुम्हीच खरे देव आहात. आभाळच फाटले, आपल्याला शिवता येईल का ?

अतुल विडूळकर एक सर्वसाधारण तरुण, यवतमाळ ला वास्तव्यास आहे. निष्कलंक पत्रकार, पुण्यनगरी, मीडिया वॉच, चित्रलेखा सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात कर्तव्य बाजावलेला होतकरू युवक. संवेदनशील व्यक्तिमत्त्व, त्याचं सहा महिन्याचं गोंडस लेकरू गंभीर आजाराने ग्रस्त आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट न केल्यास त्या बाळाच्या जीवाला धोका असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

आपल्या चिमुकलीचा जीव वाचावा यासाठी अतुल आणि त्याची पत्नी जिवाच्या आकांताने धावपळ, वणवण करत आहे. खर्च खूपच मोठा आहे आधीच परिस्थितीने गांजलेल्या अतुलच्या आवाक्याबाहेर आहे. त्याच्याजवळ जे काही आहे, ते सगळं तो विकवाक करत आहे. तरीही पैसे उभे करणे कठीण आहे.

एवढ्या लहान वयातील मुलांचे liver Transplant फक्त चेन्नई आणि गुडगाव येथेच होते. त्या शस्त्रक्रियेचा खर्च 25 लाखाच्या आसपास आहे. अतुल स्वतः liver देणार आहे. दानशूर मित्रांनो तुम्हीच खरे देव आहात, आता परीक्षा तुमचीच…तुम्ही मदत केल्यास निश्चितच ……

आपणास विनंती की, शक्य ती आर्थिक मदत करावी
Atul Vidulkar
State Bank of India
Saving Account No. 31398473291
Branch : Umarsara, Yavatmal
IFS Code : SBIN0011520
फोन पे नंबर-84088 58561

आपल्यापैकी जे मित्र वेगवेगळे ट्रस्ट, समाजसेवी संस्था, राजकारणी, दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवू शकतात, त्यांनी तसेही प्रयत्न करावेत.
(मुलीचे रिपोर्ट व मदतीचा प्रस्ताव अतुल कडून मागवून घ्यावा)

Previous articleपिकअप व ऑटोची धडक, एक ठार
Next articleदणदणीत स्पर्धेचा उत्सव, प्रज्वलन कलामहोत्सव
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.