● राजूर कॉलरी येथील घटना
रोखठोक |- येथून जवळच असलेल्या राजूर कॉलरी येथे वर्षाच्या पहिल्याच दिवशी 40 वर्षीय विकृताने आठ वर्षीय बालिके सोबत अश्लील कृत करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे
राजूर कॉलरी येथील आठ वर्षीय बालिका घरा शेजारी खेळत होती. टक्कु उर्फ प्रभूदास तालावर (40) त्या ठिकाणी आला. त्याने बलिकेला 10 रुपये देऊन आमिष दाखविले व आपल्या घरी नेले आणि तिच्या सोबत अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार कुणालाच सांगू नको असे बजावले, बालिका घरी आली आणि तिने घडलेली हकीकत पालकांना सांगितली. पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करताच पोलिसांनी टक्कु ला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी : बातमीदार