Home Breaking News उंबरकरांनी कार्यकर्त्यांवर सोपवली ‘जबाबदारी’

उंबरकरांनी कार्यकर्त्यांवर सोपवली ‘जबाबदारी’

896

पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी

रोखठोक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत वणी विधानसभा क्षेत्रात मनसे पक्ष बांधणी करताहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी 21 कार्यकर्त्यांना प्रमुख पदांची जबाबदारी सोपवली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झंझावात विधानसभा क्षेत्रात सुरू आहे. प्रमुख पदाधिकारी झपाटल्यागत पक्ष विस्तार करताहेत. तरुण, महिला व गावागावातील अन्य पक्षीय कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत. नुकताच उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख फाल्गुन गोहोकार यांचे नेतृत्वात तेजापूर येथील दीडशे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

विधानसभा क्षेत्रातील संभाव्य निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवून संघटनात्मक बांधणी व्हावी यासाठी रिक्त पदावर पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कर्तुत्वाला चालना मिळावी व पक्ष संघटन मजबूत व्हावे यासाठी उंबरकर प्रयत्न करत आहेत.

नवनियुक्त पदाधिकारी
तालुका उपाध्यक्ष – धीरज पिदूरकर, शंकर बोरगजवार
विभाग प्रमुख – अरविंद राजूरकर-घोंसा, प्रकाश कुंडेकर- मोहदा, कैलास निखाडे -कायर, गोवर्धन पिदूरकर- कोलेरा, कार्तिक तुरणकर -कोना, पियुष हेपट- लाठी (बेसा), महेश कुचनकर- शिंदोला, निखिल मालेकर – ढाकोरी, आकाश नांने -उकणी
उपविभाग प्रमुख – लक्ष्मण उपरे, अमर पाचभाई, अमोल जेऊरकर, शिरीष भवरे, मारोती बोटपेले, भारत चटप, प्रशांत बोरकर, स्वप्नील कांबळे

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष प्रवीण डाहुले, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, शहर उपाध्यक्ष गीतेश वैद्य, लक्की सोमकुंवर, शुभम भोयर, विलन बोदडकर, वैभव पुरणकर, रंजित बॊडे, विनोद कुचनकर, बंडू बॊडे, यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी : बातमीदार