● गणेशपूर येथील घटना
रोखठोक | शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील 55 वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवार दि. 31 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
सुभाष पांडुरंग बुरडकर (55) असे मृतकाचे नाव असून ते गणेशपूर येथील निवासी आहेत. घटनेच्या दिवशी त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आत्महत्येप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. त्यांनी आपले जीवन का संपवले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
वणी : बातमीदार