Home Breaking News वेकोलीचा अधिकारी लाच स्वीकारताना अटकेत

वेकोलीचा अधिकारी लाच स्वीकारताना अटकेत

8109

सीबीआयची कोळसा खाणीत कारवाई

रोखठोक | घोन्सा कोळसा खाणीत कर्तव्यावर असलेल्या सब एरिया मॅनेजर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकांना सतत पैशाची मागणी करत होता. नेहमीच्या जाचाला कंटाळून संचालकांनी सीबीआय कडे रीतसर तक्रार केली. शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी ला सायंकाळी रचलेल्या सापळ्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.

गौतमकुमार बासुटकार असे अटकेतील सब एरिया मॅनेजर चे नाव आहे. ते घोन्सा कोळसा खाणीत कर्तव्यावर आहे. घोन्सा कोळसा खाणीत श्री ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक प्रताप तोटावार यांनी कोळसा वाहतुकीचे कंत्राट घेतले आहे. या खाणीतील सब एरिया मॅनेजर गौतमकुमार हे सतत वाहतूक कंत्राटदाराला दहा लाख रुपयांची मागणी करत होता.

श्री ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक सतत होणाऱ्या रकमेच्या मागणी मुळे त्रस्त झाले होते. यामुळे त्यांनी दिल्ली येथील सीबीआय व व्हिजिलन्स यांचेकडे तक्रार दाखल केली. घटनेच्या दिवशी सायंकाळी ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये सब एरिया मॅनेजर यांना त्यांच्याच निवासस्थानी देत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहे पर्यंत पुढील कारवाई सूरू होती. या घटनेने वेकोली प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वणी: बातमीदार