Home Breaking News ते…चोरटे अवघ्या काही तासातच पोलिसांच्या ताब्यात

ते…चोरटे अवघ्या काही तासातच पोलिसांच्या ताब्यात

2118

बंडा कुलूपबंद आणि कापुस लंपास
नांदेपेरा शेत शिवारातील घटना

रोखठोक | नांदेपेरा शिवारात शेतातील बंडयातुन तीन दिवसात दोन वेळा चोरी करुन तब्‍बल चौदा क्विंटल कापसाची चोरी करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी शिताफीने तपास यंत्रणा राबवत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेत अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा छडा लावला आहे.

अंकीत संजय सोयाम (22), अविनाश दिलीप ठावरी (35), अजय रामदास दडांजे (24), अनिकेत सुभाष चिकटे (25), सचीन उध्दव पेंदोर (45) असे ताब्यातील पाच सांशीयतांची नावे आहे. रोजमजुरी हा त्यांचा व्यवसाय असून ते सर्व नांदेपेरा (पोहना) येथील निवासी आहेत. त्यांनी संगनमताने बंड्यातील कापूस चोरीचा प्लॅन आखला आणि तीन दिवसात दोन वेळा तब्बल चौदा क्विंटल कापसावर डल्ला मारला.

https://youtube.com/shorts/RW5XsTaL2oI?feature=share

नांदेपेरा शिवारात अशोक खामनकर व त्यांच्या पत्‍नी वर्षा अशोक खामनकर यांच्या नांवे 13 एकर शेत आहे. त्‍यांचे वास्‍तव्‍य वणीतील गायकवाड फैल येथे असुन त्यांची नांदेपेरा शिवारात शेती आहे. या हंगामात वेचणी केलेला 40 क्विंटल कापुस शेतातील बंडयात ठेवण्‍यात आला आणि बंडा कुलूपबंद करण्‍यात आला होता.

रविवारी मध्‍यराञीच्‍या दरम्‍यान शेतातील बंडयातुन तीन ते चार क्विंटल कापुस चोरीला गेला. तर 7 फेब्रुवारी मध्‍यराञी पुन्‍हा चोरटयांनी डाव साधला आणि कुलूप न उघडताच बंडयातील जवळपास दहा क्विंटल कापुस पुन्‍हा लांबवला. शेतमालक खामनकर यांनी सर्वप्रथम खातरजमा केली आणि पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली.

ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आशिष झिमटे व पोलीस कर्मचारी यांनी तपास यंत्रणा कार्यान्वित करत चौकशी आरंभली. अवघ्या काही तासातच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता कापूस चोरीचे बिंग फुटले.
वणी: बातमीदार