Home Breaking News शिवसेनेच्या ‘त्या’..आंदोलनाने उडाली ‘तारांबळ’

शिवसेनेच्या ‘त्या’..आंदोलनाने उडाली ‘तारांबळ’

1051

संजय निखाडे यांच्या नेतृत्वात चक्काजाम

सुनील पाटील | शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व परिसरातील मूलभूत सुविधा बाबत शिवसेनेने चारगाव चौकी येथे चक्काजाम आंदोलन केले. शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी 11 वाजतापासून तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे सातत्याने सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडतात. त्यांनी भूमीपुत्रासाठी अनेकदा न्यायिक आंदोलन करून न्यायमिळवून दिला आहे. खरिपात नैसर्गिक आपत्तीने घायाळ झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट भाव मिळावा ही महत्वपूर्ण मागणी करण्यात आली. त्या सोबतच कापसाला प्रति क्विंटल दहा हजार भाव मिळावा, सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार तर कृषी पंपाला 24 तास वीज मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक भूमीपुत्रासाठी 70 टक्के रोजगार येथील स्थापित कंपन्यात द्यावा अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे.

परिसरातील कोल इंडियाच्या माध्यमातून चालणाऱ्या कोळसा खाणी व त्यावर आधारित व्यवसायामुळे होत असलेले प्रदूषण प्रचंड घातक आहे. विविध आजाराचा सामना नागरिकांना करावा लागतो, शेतपिके बाधीत होत आहे, तरी संबंधितांनी काटेकोर अंमलबजावणी करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

याप्रसंगी सुधीर थेरे, मोरू पोतराजे, शरद ठाकरे, विलास बोबडे, संजय डवरे, निखील देरकर, पुरुषोत्तम घोगरे, शिरू दुरुतकर, बाळू टोंगे, प्रशांत बोदाडकर,आयुष ठाकरे, किशोर काळे, दत्तू ठाकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार