Home Breaking News स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

154

निमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे

सुनील पाटील | ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना प्रवाहात आणून स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी नूरजहाँ बेगम सलाम अहमद महाविद्यालयात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

येथील रॉयल फाउंडेशन तसेच शिवचरण प्रतिष्ठान यांच्या आयोजनातून आयकॅन करिअर अकॅडमी, कृष्णा मास्टर्स अकॅडमी, उड्डाण फिजिकल करिअर अकॅडमी यांच्या सहकार्यातून भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ठाणेदार प्रदीप शिरस्कार, नूरजहाँ बेगम सलाम अहमद महाविद्यालयाच्या सचिव डॉ.राणानूर सिद्धिकी यांनी भेट दिली.

स्पर्धा परीक्षेच्या आयोजनाकरिता ऍड.निलेश चौधरी, प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा परीक्षेचे नियोजन आयकॅन करिअर अकॅडमी चे सोपान लाड, कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे निलेश निवलकर आणि उडान फिजिकल करिअर अकॅडमी चे गणेश आसुटकर यांनी केले होते.

स्पर्धा परीक्षा आयोजनाकरिता शिवचरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल झट्टे, सचिव ललित कचवे, उपाध्यक्ष निखिल तुराणकर, तुषार बल्की, संतोष लाभशेट्टीवार, योगेश आवारी, हितेश गोडे, गौरव दोडके, साहिल पारखी, पवन बुऱ्हान, राजू चौधरी, सचिन भेंडाळे, दुष्यंत वासेकर, नीरज धावंजेवार, अभिजीत येरणे, अमित गायकवाड, पवन उरकुंडे, चेतन कवरासे, राजुभाऊ गव्हाणे, प्रज्वल चौधरी, स्वप्निल हिवरकर यांनी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार