Home Breaking News महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य त्रिशूल रॅली

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य त्रिशूल रॅली

715

भाविक भक्तांनी सहभाग नोंदवावा

तुषार अतकारे |- महाशिवरात्री (Mahashivratri) निमित्ताने तालुक्यातील शिरपूर गडावर भाविक भक्तांची मांदियाळी असते. भगवान शिवजी वरील श्रद्धेच्या प्रकटीकरणासाठी हजारो भाविक दर्शनासाठी जातात. माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकाराने तसेच शिवभक्तांच्या कल्पनेतुन शिरपूर येथे भव्य त्रिशूल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू धर्मातील महाशिवरात्री हा मोठा सण आहे दि. 18 फेब्रुवारीला शिरपूर गडावर मोठ्या संख्येने भाविक भक्त शंकरजीच्या दर्शनासाठी परिसरातून येतात. आपल्या भारतीय संस्कृती (Indian culture) मध्ये साजरा करण्यात येत असलेला प्रत्येक सण, समारंभामध्ये विज्ञान आहे. या सणांचा सरळ संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी आहे. याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे आपण अतिशय भक्ती भावाने प्रत्येक सण, समारंभ साजरा करीत असतो.

यावर्षी नियोजनपूर्वक शिरपूर गडावर महाशिवरात्री निमित्त जाण्यासाठी त्रिशूल रॅलीचे (Trishul rally) आयोजन समाज सहभागातून करण्यात आले आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन नियोजनबद्धरित्या आयोजित करण्यात आलेल्या या त्रिशूल यात्रेत भाविक भक्त सहभागी होणार आहे.

त्रिशूल रॅली दि. 18 फेब्रुवारीला बसस्टँड जवळील बजरंगबलीच्या मंदिरापासून सकाळी 9 वाजता निघून टिळक चौक- खाती चौक – गांधी चौक- भगतसिंग चौक- रंगनाथस्वामी मंदिर- गोकुळ नगर- लालगुडा चौपाटी पासून मंदर- चारगाव चौपाटी पासून निघून शिरपूरला पोहचणार आहे. या रॅलीच्या मार्गात शिव भक्तांचे जागोजागी स्वागत होऊन मोठ्या प्रमाणावर भाविक या रॅलीत सहभागी होणार आहेत.

महाशिवरात्री निमित्ताने आयोजित त्रिशूल यात्रेत शिव भक्तांना सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे व या रॅलीचे उपाध्यक्ष कुणाल चोरडीया, अनिल अक्केवार, निलेश परगंटीवार, सुभाष बिलोरीया, अनुज मुक्केवार, अनिल रेभे, गणेशभाऊ धानोरकर तसेच विविध समितीचे प्रमुख म्हणुन लवलेश लाल, जयेश चोरडीया, मनिष गायकवाड, संजय चिचोंळकर, जयंत सोनटक्के, सांरग बिहारी, विशाल दुधबळे, संबा वाघमारे, जनार्धन थेटे, गुजंन इंगोले, निलेश होले, हरिष मोहबीया, अमोल धानोरकर, राज चौधरी, प्रज्वल ठेंगणे, वैभव मांडवकर, शरद ढुमणे, आशिष ठाकुर, विकास चांदवडकर, निखील खाडे, अर्थव भोयर यांनी केले आहे.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांना नोंदणी करण्यासाठी टागोर चौकात केविसी टॉवर मध्ये त्रिशूल संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तेथे आपण संपर्क साधून नोंदणी केल्यास भाविकांची गैरसोय होणार नाही. तसेच रॅलीत सहभागी होण्याकरीता पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे. संपर्क क्र. ९८२२२००८६४, ७७१९९९५५९२, ९८२३०४९६५९