● सौदर्यीकरण नष्ट आणि केले अतिक्रमण
● मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन
रोखठोक : यवतमाळ मार्गावरील चिखलगांव ग्रामपंचायत हददीतील वाय पॉईंट लगत कोळसा व्यवसायीकांनी ते सौदर्यीकरण हटवून तेथे कोलडेपो थाटले. शासनाच्या जागेचा होत असलेला गैरवापर आणि नष्ट केलेले सौदर्यीकरण यामुळे त्या कोल डेपो धारकांकडून एकमुखी रक्कम वसूल करून फौजदारी दाखल करावी अशी मागणी मनसेचे तालुका प्रमुख फाल्गून गोहोकार यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
यवतमाळ महामार्गावरील चिखलगाव ग्रामपंचायतीच्या हददीत बायपास लगत शासनाच्या जागेवर खनिज विकास निधी मधुन काही वर्षांपुर्वी सौदर्यीकरण करण्यात आले होते. प्रदुषणाला काही प्रमाणात आळा बसावा या शासनाच्या उदेशाला कोलडेपो धारकांनी हरताळ फासला आहे. सौदर्यीकरण केलेल्या त्या शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून निर्माण करण्यात आलेला बगीचा उध्वस्त करण्यात आला आहे.
परिसरातील प्रदुषणाला काही प्रमाणात आळा बसावा याकरीता तात्कालीन आमदारांनी खनिज विकास निधीतुन कोलडेपो असलेल्या परिसरात छोटेखानी बगीच्याचे निर्माण केले होते. सुंदर झाडे लावण्यात आली होती. प्रदुषणावर मात व्हावी याकरीता करण्यात आलेले सौदर्यीकरण कोल डेपो धारकांच्या डोळयात खुपायला लागले आणि शासनाच्या जागेवरील ते सौदर्यीकरण नष्ट करुन कोलडपो थाटला.
महाराष्ट नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गून गोहोकार यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांना निवेदन देत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे तसेच सौदर्यीकरणावर खर्च झालेली रक्कम वसुल करून संबंधित जागेवरचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे व सदर अतिक्रमण धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवराज पेचे, लकी सोमकुंवर, गुडडू धोटे, रणजित पिंगे, अक्षय मोहुर्ले, सुरज काकडे, स्वप्नील मांदाडे, राजेश लोहबळे, विनोद गुरनुले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
वणीः बातमीदार