Home Breaking News आता.. कोरोना नंतरच्या व्हायरल आजारात वाढ

आता.. कोरोना नंतरच्या व्हायरल आजारात वाढ

571

रुग्‍ण संख्‍येत वाढ, दवाखाने फुल्‍ल

रोखठोक | उत्‍तर भारतात निर्माण झालेल्‍या वातावरणीय बदलाचा परिणाम राज्‍यातील वातावरणात जाणवायला लागला आहे. कोरोना नंतरचा हा व्हायरल आजार चांगलाच फोफावतांना दिसत असुन रुग्‍णसंख्‍येत कमालीची वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, गळयात खचखच अशी लक्षणे दिसत असुन दवाखाने फुल्‍ल झाल्‍याचे चिञ बघायला मिळत आहे.

दिवसभर ऊन सावलीचा खेळ नागरीक अनुभवतांना दिसत असुन दिवसभर तापमानात होणारी वाढ व राञी आणि पहाटे वातावरणातील गारठा अशा मिश्र स्‍वरुपांच्‍या हवामान बदलाने आरोग्‍य विषयक समस्‍या निर्माण होतांना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासुन वारंवार हवामानात बदल होत असल्‍याने प्रकृतीच्‍या समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. व्हायरल आजारात देखील वाढ होत आहे. शहरातील शासकीय रुग्‍णालये व खाजगी दवाखान्‍यात उपारासाठी नागरीकाची रिघ लागल्‍याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

पहाटे हवेत गारठा तर दिवसा हवामान सामान्‍य अशा मिश्र हवामानामुळे सर्दी, खोकला संसर्गात वाढ होत आहे. रुग्‍णांत प्रामुख्‍याने अंगदुखी, ताप, गळयात खचखच अशी लक्षणे दिसत असुन सर्वच स्‍तरातील बालकांपासुन तर वृध्‍दांपर्यतचे रुग्‍ण आढळून येत आहे.

नागरीकांनी काळजी घ्‍यावी
कोविड नंतर हा व्हायरल आजाराचा प्रादुर्भाव असल्‍याचे मत व्‍यक्‍त करण्‍यात येत असुन रुग्‍णांनी वैदयकीय सल्‍ला घेतल्‍यानंतरच औषधोपचार करावा. तसेच गळयात खचखच, सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी सारखे लक्षणे या पोस्‍ट कोविड व्‍हायरल आजारात दिसुन येत आहे. नागरीकांनी काळजी घ्‍यावी व अशी लक्षणे आढळल्‍यास डॉक्‍टरांना दाखवावे तसेच आजारातुन बरे होई पर्यंत घरीच आराम करावा.
डॉ. सचिन दुमोरेवणी