Home Breaking News ठाणेदाराच्‍या दरबारात 14 प्रकरणाचा निपटारा

ठाणेदाराच्‍या दरबारात 14 प्रकरणाचा निपटारा

642

शनिवारी करण्‍यात येते तक्रार निवारण

रोखठोक : नागरीकांच्‍या तक्रारींचे सामोपचाराने ताबडतोब निवारण व्‍हावे, याकरीता ठाणेदार प्रदीप शिरस्‍कर यांनी महीन्‍याच्‍या प्रत्‍येक शनिवारी तक्रार निवारण केंद्राची सुरवात केली आहे. आज झालेल्‍या निवारण केंद्रात चौदा प्रकरणाचा निपटारा करण्‍यात आला आहे.

पोलीस ठाण्‍याच्‍या ( police station ) परीसरात असलेल्‍या दक्षता सभागृहात आज दि. 25 फेब्रुवारीला तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. पोलीस व नागरीकांत समन्‍वय निर्माण व्हावा तसेच लहान सहान बाबी सामोपचाराने सुटाव्‍या याकरीता ठाणेदार प्रदिप शिरस्‍कर यांनी पुढाकार घेतल्‍याचे दिसुन येत आहे.

आयोजित तक्रार निवारण केंद्रात पती पत्‍नी वाद, आपसी भांडणाचे 50 ते 55 प्रकरणातील अर्जदार व गैरअर्जदार उपस्‍थीत  होते. यावेळी पोलीसांनी मध्‍यस्‍थी करत एकुन चौदा प्रकरणाचा न्‍याय निवाडा केला.

पोलीस अधिक्षक डॉ. पवन बंसोड, अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्‍जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रदिप शिरस्‍कर, API माधव शिंदे, पोलीस अंमलदार प्रभाकर कांबळे, सुहास मंदावार, अमोल अन्‍नेलवार यांनी महत्‍वाची भुमिका बजावली.
वणी : बातमीदार