Home Breaking News वणी आगारात अपघात, कर्तव्यावरील कर्मचारी ठार

वणी आगारात अपघात, कर्तव्यावरील कर्मचारी ठार

3639

निष्काळजीपणा ठरला कारणीभूत

रोखठोक | राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वणी आगारात रात्री 8 वाजताच्या दरम्यान अनपेक्षित अपघात झाला. रिपेअर झालेली बस मागे घेत असताना लगतच दुसऱ्या गाडीचे काम करत असलेल्या कामगाराला भीषण धडक बसली यात 41 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कमलेश सेनापती धोपटे (41) असे दुर्दैवी मृतक कामगारांचे नाव आहे. ते भोंगळे लेआऊट परिसरात वास्तव्यास होते. ते आपले वणी आगारात कर्तव्य बजावत होते. त्याच सुमारास आगारातील रिपेअर झालेली दुसरी बस हेड मेकॅनिक जीवन उईके ट्रायल घेत होते. त्यांनी बस मागे घेतली आणि कमलेश च्या डोक्याला जबर मार लागला.

यावेळी घडलेल्या भीषण अपघातात कमलेश चा नाहक बळी गेला असून आगारातील निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. घटना घडताच कामगारांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या भयाण घटनेने वणी आगराची कार्यप्रणाली चव्हाट्यावर आली असून नेमकी काय कारवाई होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मृतक कमलेश हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या मृत्यूने पारिवारिक मंडळी व आगारातील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. त्याचे पाश्चात्य आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्तस्वकीय परिवार आहे.
वणी: बातमीदार