Home Breaking News बनावट FDR…..बँक संचालक ‘येल्टीवार’ अपात्र

बनावट FDR…..बँक संचालक ‘येल्टीवार’ अपात्र

1994

विभागीय सहनिबंधक यांचा आदेश धडकला

रोखठोक | बँक संचालक तथा कंत्राटदार राजीव मल्लारेडडी येल्टीवार यांनी 18 लाख रुपयांची बनावट FDR तयार करून बँकेची व जिल्हा परिषद बांधकाम विभागाची फसवणूक केली होती. या प्रकरणी विभागीय सहनिबंधक यांनी दि. 27 फेब्रुवारी ला आदेश पारित करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समिती सदस्य या पदावरुन काढून टाकण्यांत येत असल्याचे स्पष्ट केल्याने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बनावट FDR प्रकरणी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (ब) नुसार नोटीस बजावली होती. 15 दिवसांचे आत म्हणने मांडावे असे सुचविण्यात आले होते. राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना पूर्णसंधी देऊनही त्यांनी कोणतेही म्हणणे मांडलेले नाही असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणी जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा टिकाराम कोंगरे यांना विचारणा केली असता कोणताही आदेश बँकेला प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले

प्राथमिक व वैधानिक चौकशी अहवाला वरुन येल्टीवार यांनी संस्थेच्या व सदस्यांच्या हितास बाधक होईल अशी कृती केलेली असल्याचे व गंभीर वित्तीय नियमबाहय बाबी / अफरातफरी केलेले असल्याचे उघड झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ अ (ब) नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. यवतमाळ या बँकेचे संचालक म्हणून राहण्यास अपात्रता धारण केलेली असल्यामुळे खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत असल्याचे विभागीय सहनिबंधक डी.एम. पालोदकर यांनी आदेशीत केले आहे.
वणी: बातमीदार