Home Breaking News कारागृहातून रजेवर आलेला फरार कैदी ‘जेरबंद’

कारागृहातून रजेवर आलेला फरार कैदी ‘जेरबंद’

921
Img 20241016 Wa0023

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

तुषार अतकारे: नागपूर मध्यवर्ती कारागृहातुन (Nagpur Central Jail) अभिवचन रजेवर आलेला कैदी गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. तो कारागृहात परतलाच नसल्याने त्याचेवर पाळत ठेवण्यात आली होती. त्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

दिपक यशवंत पुणेकर असे अटक करण्यात आलेल्या कैदीचे नाव आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कोरोना कालखंडात आकस्मीक अभिवचन रजेवरुन त्याला सोडण्यात आले होते. मात्र रजा संपून देखील तो कारागृहात परतलाच नाही त्यामुळे त्याचा शोध सुरू होता.

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून अभिवचन रजेवर आलेला कैदी दिपक पुणेकर हा छोरीया लेआउट जवळ गणेशपुर  वणी परिसरातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांना मिळताच त्याला अटक करण्यात आली.

सदर कारवाई API अमोल मुडे, PSI योगेश रंधे,  योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
वणी: बातमीदार