Home Breaking News महामूर्ख संमेलनात हास्यरंगाची पेरणी

महामूर्ख संमेलनात हास्यरंगाची पेरणी

505

● मंगळवारी शेतकरी मंदिरात आयोजन

रोखठोक | रंगपंचमीच्या उत्सवात हास्यरंगाची पेरणी करणारे कार्यक्रम म्हणजेच महामूर्ख संमेलन. प्रख्यात हास्य कवींच्या दमदार व्यंगात्मक कविता आणि हास्याचे फवारे. रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 2 वाजता शेतकरी मंदिरात आयोजन करण्यात आले आहे.

मागील पन्नास वर्षांपासून अविरतपणे सुरू असणारे महामूर्ख संमेलन यावर्षीही धडाक्यात होणार आहे. सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. राम शेवाळकर यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेले हे संमेलन हस्यरंगाची उधळण करणारे आहेत.

महामूर्ख संमेलनात यावेळी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता एजाज खान – नागपुर, तसेच सुप्रसिद्ध कवी अनिल दिक्षित – पुणे हे कार्यक्रमाचे खास आकर्षण राहणार आहे. वणीचे सुप्रसिद्ध नाटय व हास्य कलावंत प्राचार्य हेमंत चौधरी व वऱ्हाडी कवी पुरुषोत्तम गावंडे हे देखील प्रेक्षकांना मनमुराद हसविणार आहे.

महामूर्ख संमेलनाला समस्त वणीकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. असे आवाहन आयोजक मुन्नालाल तुगनायक, शशिकांत माळीचकर, जयचंद खेरा, संजय खाडे, राजेश महाकुलकार, भुमारेडडी बोदकुरवार, विलन बोदाडकर, गजानन बोढे, सुनिल पानघाटे यांचे वतीने करण्यात आलेले आहे.
वणी :बातमीदार