● डॉ. भालचंद्र चोपणे यांचा सरकारला इशारा
रोखठोक | सत्कारमुर्ती म्हणुन बोलतांना माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र चोपणे चांगलेच कडाडले. ओबीसीची जातनिहाय जनगणना नाही तर मतदान ही नाही असे स्पष्ट करत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. ते OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर सत्कार समारोह प्रसंगी बोलत होते.
शनिवार दि. 4 मार्च ला येथील वसंत जिनिंग लॉन मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी नवनिर्वाचीत विधान परिषद सदस्य आ. धिरज लिंगाडे, आ. सुधाकर अडबाले, आ. अभिजीत वंजारी व डॉ. भालचंद्र चोपणे यांचा भव्य सत्कार समारोह आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उदघाटक खा. बाळु धानोरकर यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव चटप तर स्वागताध्यक्ष म्हणुन संजय खाडे यांची उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमात प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष- लोकजागर अभियान, नागपूर यांचे “जातनिहाय जनगणना आणि OBC (VJ, NT, SBC) आंदोलनाची भूमिका” या विषयावर दणदणीत व्याख्यान झाले.
वाकुडकर यांनी विस्तृत विवेचन करतांना शेतकऱ्याच सरकार, बहुजनांच सरकार असलं पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीपदी शेतकऱ्यांचा मुलगा असावा असे स्पष्ट केले. तर उदघाटक म्हणुन बोलतांना खा. धानोरकर म्हणाले की, केंद्राची किंवा राज्याची एकही योजना जी सर्वसामान्य लोकांसाठी बेरोजगारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, भगीनींसाठी, अशी कुठलीही योजना नसल्याची खंत व्यक्त केली.
याप्रसंगी आ. प्रतिभा धानोरकर, तात्यासाहेब मत्ते, प्रदिप बोनगिरवार यांची उपस्थिती होती. प्रास्तावीक मोहन हरडे, सूत्रसंचालन प्रदिप बोरकुटे व रघुनाथ कांडारकर यांनी तर सत्कारमूर्तीचा परिचय रवी चांदणे व नितीन मोवाडे यांनी केले. सन्मानपत्र वाचन सोनाली जेनेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. राम मुडे यांनी मानले. या जाहीर सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वणीकरांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
वणी: बातमीदार