● न्यायालयाचा निर्णय, आदेश निर्गमित
रोखठोक | धुलीवंदनाचा दिवस मद्यपीसाठी आगळीवेगळी पर्वणीच. रंगाची उधळण आणि मदिरा प्राशन…हे नातेच वेगळे. तरुणाईची हुल्लडबाजी, वयस्कांचा गोतावळा आणि मदिरेचा आस्वाद असं असताना ड्राय डे (dry day) हे न पचणारे कोडे न्यायालयाने सोडवले आहे.
धुलीवंदन सणा निमीत्य कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून ड्राय डे (dry day) घोषित करण्यात आला होता. दि. 7 मार्चला संपूर्ण दिवस दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेशीत करण्यात आले होते.
न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने संपूर्ण बाबीची पडताळणी केली. याचिके बाबतचे निरीक्षण नोंदवून जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या कलम 142(1) अन्वये अधिकाराचा वापर करून जिल्हा ड्राय डे (dry day) घोषित केल्याचे दिसून आले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उत्पादन शुल्क विभागाला आदेशीत केले आहे. तसेच वरील आदेशाचे उल्लंघन करणा-या अनुज्ञप्ती धारकाविरूध्द नियमानुसार योग्य ती कठोर कार्यवाही करून तसा अहवाल सादर करावा असे सुचवण्यात आले आहे. त्याप्रमाणेच त्या कार्यक्षेत्रात काही अनुचीत किंवा गैरप्रकार आढळून आल्यास त्याबाबत त्यांना व्यक्तीशा जबाबदार धरण्यात येईल असे आदेशीत करण्यात आले आहे.
वणी : बातमीदार