Home Breaking News गडकिल्ल्यांचा देखावा, महाराजांचा अभिषेक आणि जय भवानी जय शिवाजीचा गजर

गडकिल्ल्यांचा देखावा, महाराजांचा अभिषेक आणि जय भवानी जय शिवाजीचा गजर

300

मनसेच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव

रोखठोक | जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती दि. 10 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी, लेझर शो आणि भव्य मिरवणूक विशेष आकर्षण असणार आहे.

शिवतीर्थावर गडकिल्ल्यांचा देखावा साकारण्यात आला आहे. सकाळी 6:54 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक 21 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. दुपारी 4 वाजता बाईक रॅली संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करणार आहे.

सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शिवतीर्थावर उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे करतील. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीसह विद्युत रोषणाई, लेजर शो द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार