Home Breaking News Big News… बलात्कार प्रकरणी ‘त्या’ दोघांना जन्मठेप

Big News… बलात्कार प्रकरणी ‘त्या’ दोघांना जन्मठेप

2974

महीला दिनी न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

रोखठोक : नऊ वर्षांपूर्वी येथील एका महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर प्रियकर व त्याच्या तीन मित्रांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी 15 एप्रिल 2014 ला वणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

प्रफुल्ल धुळे (31) व संदिप कुरेकार (35) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर मनोज दुबे व प्रफुल धांदे यांना संशयाचा फायदा देवुन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. विस्तृत माहिती अशी की, पीडिताची प्रफुल्ल सोबत ओळख होती. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरीने शाररिक संबंध प्रस्थापित करण्यात आले होते.

प्रफुल्लने पीडित प्रेयसीला दि. 27 मार्च 2014 ला वणीतून दुचाकीवर बसवले व मारेगाव रोड वरील टेकडीवरील मंदिराचे मागील जंगल भागात नेले. तेथे पिडीते सोवत शरिरसंबंध करत असतांना संदिप आपल्या दोन मित्रांसह पोहचला. त्यानी पिडीतेला शरिर संबंध करू देण्याची मागणी केली आणि प्रियकरासमक्ष जबरदस्तीने शरिर संबंध प्रस्थापित केले. तसेच ही बाब कोणाला सांगशील तर तुझे हे छायाचित्र फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली.

पीडितेने तब्बल 18 दिवसानंतर वणी पोलिसात तक्रार दाखल केली. तत्कालीन ठाणेदार गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांनी प्राथमीक तपास केला व आरोपी विरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने सर्व आरोपी विरुद्ध दोषरोप पत्र दाखल करण्यात आले. विशेष सत्र न्यायालयात अभीयोजन पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले.

सरकारी वकिल ऍड आर. डी. मोरे यानी प्रभावी युक्तीवाद करून सबळ पुरावे न्यायालयात सादर केले व सरकारी पक्षाची बाजू ग्राहय माणून परिक्षण न्यायालयाने वरील निर्णय पारीत करण्यात आला. प्रस्तुत प्रकरणाचा पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉ अनिल दानव यांनी काम पाहिले व आरोपी तर्फे ऍड. धात्रक व ऍड. हैदरी यांनी कामकाज पाहिले.

प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होऊन आरोपी प्रफुल यास भादंवीचे कलम 376 (2) (एन) मध्ये 10 वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 5 महिने अतिरिक्त सश्रम करावास, कलम 376 (ड) मध्ये 20 वर्ष सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंड. व दंड न भरल्यास 20 महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास, कलम 417 मध्ये 6 महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास, कलम 506 मध्ये 6 महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा अतिरिक्त मश्रम कारावास ठोठावला आहे

आरोपी संदिप यास भादवि कलम 376 (ड), मध्ये 20 वर्ष सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावास कलम 506 मध्ये 6 महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त सश्रम कारावास अशी एकत्र रित्या शिक्षा भोगण्यासंबंधीचा आदेश न्यायालयाने पारीत केला आहे.
वणी: बातमीदार