Home Breaking News अबब…मतदार संघासाठी बारा महिन्यांतच 200 कोटी रुपयांचा निधी

अबब…मतदार संघासाठी बारा महिन्यांतच 200 कोटी रुपयांचा निधी

1463

इतिहासातील ऐतिहासिक कार्यप्रणाली

सुनील पाटील | स्वातंत्र्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रात अवघ्या बारा महिन्यातच रस्ते विकास व देवस्थानाचे सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्याचा अभूतपूर्व पराक्रम आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला. विधानसभा क्षेत्रासाठी एका वर्षात एवढा मोठा निधी आणल्याने इतिहासातील ऐतिहासिक कार्यप्रणाली सिद्ध झाली आहे.

निव्वळ आश्वासने आणि गाजर दाखविण्यात आत्ता पर्यंतच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ मतदारसंघातील नागरिकांना परिचित आहे. शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असणारा विकासात्मक पवित्रा राबवणे सध्यस्थीतीत काळाची गरज आहे. रस्ते, सिंचन, आरोग्य आणि दळणवळण ह्या महत्वपूर्ण बाबीच मूलभूत गरजा असल्याचे आर्थिकीकारणांचा युगात आ.बोदकुरवार यांनी हेरले आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील राज्य महामार्गाच्या विकासासाठी 47 कोटी, जिल्हा अंतर्गत रस्त्यासाठी 4 कोटी 10 लक्ष, ग्रामीण रस्ते विकासासाठी 24 कोटी 60 लक्ष, जनजाती क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत आदिवासी भागासाठी 10 कोटी 96 लक्ष रुपये तर जमीन अधिग्रहण करण्यासाठी 7 कोटी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ग्रामीण दलित वस्ती विकासासाठी 4 कोटी रुपये, 25-15 अंतर्गत ग्रामीण भागासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे.

तालुक्यातील श्री. जगन्नाथ बाबा तिर्थक्षेत्र भांदेवाडा येथील विकासकामांसाठी 2 कोटी, कुलस्वामिनी जैताई माता देवस्थान साठी एक कोटी, वणीकरांचं कुलदैवत रंगनाथस्वामी देवस्थान साठी एक कोटी तर तालुक्यातील गोडगांव माता देवी देवस्थान करिता एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वणी-ढाकोरी रस्ता, मोहदा- टुंड्रा रस्ता, खैरी- वडकी कडे जाणारा रस्ता, पाटण- झरी, माथार्जुन- सुरदापुर, झरी- पाटण, अडेगाव- खातेरा, गणेशपूर- कोसरा, मारेगाव- मार्डी या रस्त्यासाठी 80 कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्याची कामे प्रगतीपथावर असून अवघ्या काही महिन्यातच ही महत्वपूर्ण कामे पूर्णत्वास जाणार आहे.

मतदारसंघातील घोन्सा- शिबला मार्गाने केळापुर- पारवा कडे जाणारा मार्ग, वणी- नांदेपेरा-मार्डी- खैरी वडकी कडे जाणारा मार्ग, चारगावं- शिंदोला पासून चंद्रपूरच्या सीमेपर्यंतचा रोड, रासा- बोर्डा करणवाडी- कुंभा खैरी पर्यन्तच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गासाठी फार मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार दिली.
वणी: बातमीदार