Home Breaking News चिमुकल्‍या “मनस्‍वी” च्‍या गगनभरारीला ‘मन’से सलाम

चिमुकल्‍या “मनस्‍वी” च्‍या गगनभरारीला ‘मन’से सलाम

807

राजु उंबरकर उचलणार प्रशिक्षकांचा खर्च

रोखठोक | अवघ्‍या पाच वर्षाची चिमुकली मनस्‍वी, किती वर्णावी तिची महती, स्केटिंग या खेळातून तिने राज्यस्तरीय तथा राष्ट्रीयस्तरावरील अनेक सुवर्णपदके पटकावले आहे. चिमुकल्‍या मनस्‍वीच्‍या गगनभरारीला मनसेचे राज्‍य उपाध्‍यक्ष राजु उंबरकर यांनी ‘मन’से सलाम करत प्रशीक्षकांचा खर्च उचलण्‍याची ग्वाही दिली आहे.

पुण्‍यात वास्‍तव्‍यास असलेल्‍या मनस्‍वी विशाल पिंपरे हिचे मुळ गांव मारेगांव तालुक्‍यातील बोटोनी हे आहे. ती परिवारांसह येथे आली असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी तिची सदिच्‍छा भेट घेत तिचे कौतुक केले. तिला रोख एकवीस हजार रुपयाची भेट देत प्रशिक्षणाकरिता उच्च प्रतीचे प्रशिक्षक व त्यांचा सर्व खर्च आपण उचलणार असल्‍याची ग्‍वा‍ही दिली.

मनस्‍वी हिने स्केटिंग या खेळातून राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील अनेक सुवर्णपदके पटकावले आहे. आत्तापर्यंत 60 गोल्ड मेडल 7 सिल्व्हर मेडल व 8 ब्राँझ मेडलसह स्केटिंग मध्ये 16 बुक ऑफ रेकॉर्ड व गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नांव कोरले आहे. तसेच तिने 1 इंटरनॅशनल, 7 नॅशनल, 8 स्टेट लेवल आणि 31 जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये यश मिळवले आहे.

फायर गर्ल मनस्‍वीने प्राप्‍त केलेले पुरस्‍कार
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर
16 बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर
सुवर्णलक्ष नॅशनल स्पोर्ट अवॉर्ड प्राप्त
मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार
राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2023
भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार 2022
राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2022
कोंढवा भूषण पुरस्कार 2022
गुणगौरव विशेष पुरस्कार 2022
राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2022
कोंढवा भूषण पुरस्कार 2022
गुणगौरव विशेष पुरस्कार 2022

मनस्‍वी ही 50 मीटर लांब फायर लिंबो स्केटिंग करणारी जगातील पहिली 5 वर्षाची मुलगी ठरली आहे. तीने पुणे ते बारामती 102 किमी रिले  स्केटिंग, 81 तास नॉन स्टॉप रिले स्केटिंग, 96 तास रिले स्केटिंग मध्ये सहभाग नोंदवला आहे. तिने मालदीव येथे आपल्या देशासाठी 3 सुवर्ण पदके मिळविले आणि आजपर्यंत 63 पेक्षा जास्त मान्यवरांकडून तिला सन्मानित करण्‍यात आले आहे.
वणी : बातमीदार

Previous articleविष प्राशन करून तरुणांची आत्महत्या
Next articleअन्यथा….महाराष्ट्र बंद ची हाक द्या…!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.