Home वणी परिसर अन्यथा….महाराष्ट्र बंद ची हाक द्या…!

अन्यथा….महाराष्ट्र बंद ची हाक द्या…!

645

क्रांती युवा संघटनेचा संपाला पाठिंबा

रोखठोक | बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत लढाई सुरू ठेवा आणि महाराष्ट्र बंद ची हाक द्या… असे आवाहन क्रांती युवा संघटनेचे संस्थापक राकेशभाऊ खुराणा यांनी केले असून जाहीर पाठिंबा दिला आहे.

जुनी पेन्शन योजना सुरू करावी याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, पंचायत समित्या, महापालिका, जिल्हा परिषदा तसेच तहसील कार्यालयांसह सरकारी विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. एकच मिशन, जुनी पेंशन ही मागणी लावून धरत येथील तहसील कार्यालयालगत कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू आहे.

क्रांती युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अविनाश भुजबलराव म्हणाले की मागण्या रास्त आहे आणि शासनाला ते मान्य कराव्याच लागेल अन्यथा क्रांती युवा संघटना शांत बसणार नाही असा इशारा दिला तर क्रांती युवा संघटनेचे ऍड सूरज महारतळे यांनी संघटना ठामपणे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी क्रांती युवा संघटनेचे कपिल जुनेजा, अविनाश भुजबलराव, सुरज महारतळे, राजु गव्हाणे, सुरज चाटे, सुनिल चिंचोळकर, वैभव खडसे, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
वणी: बातमीदार